मोटोरोलाने ₹२३,९९९ मध्ये पॅन्टोन मायकोनोस ब्लू म्हणजे आकाशातील निळा कलर वाणी फिनिश केलेला फोन लूणच केलाय
१० जून २०२५ रोजी मोटोरोलानं भारतात आपला नवा स्मार्टफोन Edge 60 लाँच केलाय. आता कोण म्हणतंय, “हा काय फोन आहे का?”
अहो, थोडं लक्ष द्या –
हे काही साधंसुधं बिस्किट नाही, हा फोन म्हणजे खरंच “झणझणीत मिसळ” आहे!
आधी याचं खानदान बघा –
हा Edge 60 फोन आहे त्याच कुटुंबातला –
त्याचं नाव आहे Edge60 Pro, Edge 60 Stylus, Edge 60 Fusion…
आणि आता हा मधल्या वर्गातला लाडका बाळ – Edge 60 आलेला आहे.
हे फोनची बॉडी नाही हो, ही तर कवचं आहे!
- MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेट – म्हणजे आर्मीचे जवान वापरू शकतील इतकं मजबूत!
- IP68 + IP69 – पाणी, धूळ, गाळ काहीही येऊ द्या…
फोन फडफडीत टिकतो. - Gorilla Glass 7i – म्हणजे फोन पडलं तरी “आई गं” म्हणायचं कारणच नाही!

स्क्रीन तर बघा…
- ६.७ इंचाचं 1.5K Super HD quad-curved pOLED डिस्प्ले
- 120 Hz Refresh Rate – स्क्रोल करताना असं वाटतं, जसं बायकोचा हात धरून मॉलमध्ये फिरतोय
- ४,५०० निट्स ब्राईटनेस – ऊन पडो की चांदणं, स्क्रीन तेवढंच तेजस्वी!
बॅटरी – दिवसभर निवांत!
- ५,५०० mAh बॅटरी – एकदा चार्ज केला की सायंकाळी नाचायला जाईपर्यंत बॅटरी टिकते
- ६८ वॅटचा चार्जर बॉक्समध्येच आहे – काही ब्रँडसारखं “चार्जर वेगळं घ्या” असं खोडसाळपण नाही!
आवाज – म्हणजे थेट सभेतला धडधडाट!
- Dolby Atmos आणि Hi-Res Audio
- आवाज एवढा जबरदस्त, की सभागृहात लावला तरी लोकं म्हणतील, “राजसाहेब बोलतायत वाटतं!”
आता मूळ ताकद बघा… म्हणजे मेंदू
- MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर – हाडाचा ताकदवान प्रोसेसर
- १२ GB RAM आणि २५६ GB स्टोरेज – म्हणजे फोन मध्ये जागा अपुरी पडेल, हे कारण देऊन काही काम चुकवू नका!
- Hello UI – Android 15 वर चालणारं
नाव आहे Hello, पण परफॉर्मन्स आहे “धडधडीत नमस्कार!”
थोडक्यात काय?
हा फोन आहे त्यांच्या साठी –
जे फालतू मार्केटिंग नाही बघत, पण कामात ताकद बघतात!
हा फोन त्या माणसासाठी आहे –
जो WhatsApp वर good morning पाठवून वेळ घालवत नाही, तर ऑफिस रिपोर्ट बनवतो आणि जिद्दीनं काहीतरी करत राहतो!
म्हणून सांगतो, गावकऱ्यांनो… मोबाईल घ्यायचाय का?
तर हा Motorola Edge 60 एकदा बघाच.