shark tank
shark tank
सोनी टीव्ही चॅनेलवर आज 2 जानेवारीपासून पासून शार्क टँकच्या दुसऱ्या सीजनला सुरुवात झाली आहे. सोनी टीव्ही var paha शार्क टँकच्या
या कार्यक्रमात स्टार्टअप बद्दलच्या अनेक संकल्पना सांगण्यात येतात. त्याबद्दलच सविस्तर माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

१. ग्रॉस सेल्स (एकूण विक्री) –
ग्रॉस सेल्स ही उद्योगातील मूलभूत संकल्पना आहे. समजा एखाद्या कॅडबरी कंपनीने १० रुपयांच्या १,००,००० कॅडबऱ्या विकल्या.
तर त्यांचा ग्रॉस सेल्स हा १०,००,००० रुपये झाला. थोडक्यात जेवढ्या वस्तूंची विक्री होईल तेवढ्या वस्तूंच्या किमतीएवढा ग्रॉस सेल्स झाला असे समजले जाते.

२. इक्विटी (अनिश्चित स्वरूपाचे व्याज) –
आपण जेव्हा आपला उद्योग चालू करतो तेव्हा त्यात आपली १००% हिस्सेदारी असते. पण समजा उद्योग वाढवण्यासाठी कोणी आपल्या व्यवसायात गुंतवणूक केली
तर त्याला त्यामधील काही भाग हिस्सेदारी म्हणून दिला जातो. त्यालाच इक्विटी किंवा अनिश्चित स्वरूपाचे व्याज असेही म्हणतात.

३. व्हॅल्युएशन (मूल्यांकन) –
व्हॅल्युएशन या शब्दाला आपण मराठीमध्ये मूल्यांकन असेही म्हणू शकतो. आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.

सोनी टीव्ही

समजा एखाद्या कंपनीला आपण आपल्या कंपनीची १०% हिस्सेदारी १,००,००० रुपयाला देऊ तेव्हा त्याचे मूल्यांकन १०,००,००० रुपये होते. कधी कधी यामध्ये कमी जास्त किंमत होऊ शकते.

४. नेट सेल्स (निव्वळ विक्री) –
कंपनीच्या व्यवहारातील ग्रॉस सेल्स मधून काही गोष्टी काढल्या की नेट सेल्स उरतो. समजा एका वर्षात आपण १०,००,००० रुपयांचा उद्योग केलेला असेल पण त्यामध्ये १,००,००० रुपये डिस्काउंट,
१,००,००० रुपये प्रोडक्ट रिफंड आणि १,००,००० रुपये कर्मचारी भात्यावर खर्च झालेले असतील तर नेट सेल्स (निव्वळ विक्री) ७,००,००० रुपयांचा झाली असे समजावे.

५. रेव्हेन्यू (उत्पन्न) –
कंपनीने वेग वेगळ्या माध्यमातून एकूण जेवढे उत्पन्न जमा केले आहे त्यालाच त्या कंपनीचे रेव्हेन्यू (उत्पन्न)
असेही म्हटले जाते. निव्वळ विक्री, सेवांमधून मिळालेले उत्पन्न आणि गुंतवलेली एकूण रक्कम यांची एकूण बेरीज केल्यावर रेव्हेन्यू म्हणजेच उत्पन्न मिळते.

६. नेट रेव्हेन्यू (निव्वळ उत्पन्न) –
आपण वर्षभरात जेवढे उत्पन्न मिळवले आहे त्यातून खर्च, सवलत आणि उत्पादनावरच्या खर्चाची वजाबाकी केली की नेट
रेव्हेन्यू म्हणजेच निव्वळ उत्पन्न बाकी राहते.
One thought on “शार्क टॅंक कार्यक्रमातील स्टार्टअप संकल्पना”

Comments are closed.