HOME

stories

STORIES

google-news

FOLLOW

FOLLOW

JOIN

मैत्री, स्पर्धा आणि मनातली सल – एक अनुभव

by

admin

Updated: 04-07-2025, 06.21 PM

Follow us:

नमस्कार,

माझी एक जुनी मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच कॉलेजात होतो. नंतर दोघींचं लग्न झालं आणि योगायोगाने आम्ही एकाच शहरात स्थायिक झालो.

कॉलेजमध्ये असताना मी काहीशी तिच्या पुढे होते — अभ्यासात, स्पर्धांमध्ये, अगदी निवडणुकीतही. एकदा आम्ही दोघी लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी उभ्या राहिलो होतो. तिला फक्त दोन मते मिळाली आणि मलाच बहुमताने निवडून दिलं गेलं. यात माझा काही दोष नव्हता, पण तिने हे ‘राजकारण’ असल्यासारखं सांगितलं.

आम्ही दोघी नाटकांमध्येही भाग घ्यायचो. एका वेळेस तिला निवडलेलं असूनही, शेवटी माझीच निवड झाली – “सोनेरी केस” आणि “घोगऱ्या आवाजाची मुलगी नको” असं सांगून. हे तिनेच मला सांगितलं. टुर्नामेंट्समध्येही मी वरचढ ठरले. हे सगळं पाहून ती अनेक वेळा म्हणायची – “तू किती गोष्टीत पुढे आहेस!”

मैत्री आणि मत्सर

कॉलेज संपलं, संपर्क सुटला. अनेक वर्षांनी आमच्या मुलांच्या शाळेत पुन्हा भेट झाली. नातं तुटावं म्हटलं तरी तसं होत नाही. आमची मुलं एकाच शाळेत, आणि आम्ही रोज शाळेसमोर भेटतो.

ती अजूनही तशीच आहे. माझ्याशी बोलताना तीने तिच्या घरातल्या सगळ्या गोष्टी ठामपणे सांगते इतकेच न्हवे मुलांचा अभ्यास तीच कसा घेते , डबा तीच कसा बनवते, शाळेत तीच कशी आणते , आणि असेच बरेच काही गोष्टी तिचा हेतू नेहमी मला दाखवून देण्याचा असतो की मी तिच्या किती मागे आहे.

हे सगळं करताना ती स्वतःलाच थकवून टाकते. एकदा बॅडमिंटनसाठी खूपच ओढाताण केली आणि गळ्याच्या दुखण्यामुळे डॉक्टरांनी तिला वर्षभर विश्रांतीचा सल्ला दिला. तरीही ती आपलीच मेहनत मला सांगत राहते. खरं सांगायचं तर तिचं हे धाडस, चिकाटी मला आवडतेही. मी तिला त्याचं कौतुकही नेहमीच करत आले आहे. पण तिचं हे “मीच सर्वोत्तम” असं सतत सांगणं आता थोडं त्रासदायक वाटायला लागलं आहे.

माझा उद्देश तिला कमी लेखण्याचा नाही. फक्त तिचं हे सततचं स्पर्धात्मक वागणं – ते जरा थांबावं, ही इच्छा आहे. आता ते मर्यादेपलीकडे गेलं आहे, पण तरीसुद्धा मला ते गप्प बसून सहन करावं लागतंय.

मी अशी एखादी युक्ती शोधतोय ज्यातून ती न दुखावता, तिचं वागणं थोडं सुसंवादित होईल. पण काही सुचत नाहीये. तिला डायरेक्ट विचारून सांगावं तरी ती समजून घेईल, असं वाटत नाही.
कृपया अशा काही कल्पना द्या, ज्यामुळे मी शहाणपणाने, तिचा स्वाभिमान न दुखावता, हे सगळं हाताळू शकेन.

Leave a Comment

आमच्याबद्दल

आमचं हे न्यूजचं साइट मस्त ताज्या-ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला बनवलंय. देश-विदेश, राजकारण, क्रीडा, सगळं सरळ-सोप्या भाषेत देतो. खोटं-फोटं काही नाही, खरी माहितीच देण्याचा आमचा ध्यास आहे. तुमी अपडेट राहा, बाकी आम्ही बघतो!