
(व्यवसायात मेहनत असते, पण presentation नसतो…
गणपतीच्या हारात भाव असतो, पण rate card नसतो.)
तो उत्कृष्ट वडा पाव बनवतो.
स्वतः चहा उकळतो, मिरची तलतो, ग्राहकाला हसून बोलतो…
पण ग्राहक विचारतो –
“UPI आहे का?”
तो म्हणतो –
“कॅश द्या भाऊ…”
कपड्यांचं दुकान आहे, दर्जा भारी…
पण बोर्ड faded आहे, फोन उचलत नाही, WhatsApp वर reply नाही.
म्हणजे काम चांगलं, पण मांडणीचं भान नाही.

मग प्रश्न –
“मराठी माणूस व्यवसाय करताना Professional का राहत नाही?”
1. व्यवसाय ‘काम’ वाटतो, ‘ब्रँड’ नाही
आपण म्हणतो –
“मी दुकान चालवतो”,
“मी स्टॉल टाकतो”,
“मी टपरी लावतो”…
पण म्हणत नाही –
“मी Local Brand उभा करतो”,
“मी Micro Entrepreneur आहे”,
“मी Self-employed Professional आहे.”
📌 भाषा बदलली की दृष्टिकोन बदलतो.
दृष्टिकोन बदलला की व्यवसाय बदलतो.
2. ‘व्यवसाय’ म्हणजे फक्त विक्री – असं समजणं
मराठी माणूस विकायला भारी आहे.
घाम गाळतो, कष्ट करतो, पण…
- त्याचं logo नाही
- व्हिजिटिंग कार्ड नाही
- सोशल मिडिया नाही
- फॉलोअप नाही
- ग्राहक सेवा नाही
📌 ते सगळं “corporate लोक करत असतील” असं समजतो.
3. ‘जुनी पद्धत चालत होती’ – ह्या सवयीवर अडून बसणं
“माझे ग्राहक ठरलेत…”
“माझं काम बोलतं…”
“मला मार्केटिंगची गरज नाही…”
हे संवाद २०२५ मध्येही ऐकू येतात.
पण ग्राहक आज reels, ratings आणि responsiveness वर निर्णय घेतो.
📌 व्यवसाय चालतोय,
पण पुढे जात नाही – कारण presentation गहाळ आहे.
4. Tech ची भीती – इंग्रजीचा बाऊ
“Instagram कसं वापरायचं?”,
“QR लावायचा पण कधी update होतो कळत नाही”,
“फॉर्म्स, apps, WhatsApp tools… हे आपल्याला जमत नाही”
📌 Professional होण्यासाठी इंग्रजी लागतो असं समजणं –
हेच मोठं अडथळा आहे.
5. क्लायंटला ‘सर’ म्हणतो, पण स्वतःची value कमी ठेवतो
तुम्ही मेहनती आहात,
पण दर वेळेस “discount देतो”, “उधारी चालेल”, “पैसे नंतर द्या” म्हणता.
तुमच्या कामाला तुमचं professional rate नाही.
📌 व्यवसायात आत्मसन्मान लागतो,
भावुकता नाही
6. सिस्टम नाही – सगळं डोक्यावर
- काय माल शिल्लक आहे – डोक्यात
- कोण उधारीवर आहे – डोक्यात
- किती कमावलं – डोक्यात
- काय पोस्ट करायचं – विसरलं
📌 व्यवसाय sustainable नसायचा कारण सिस्टीम नसते.
7. Follow-up, Review, Feedback याकडे दुर्लक्ष
तुमचं काम आवडलं तरी
तुम्ही review विचारत नाही
follow-up करत नाही
email/DM उघडत नाही
📌 ग्राहक retain होत नाही कारण प्रोसेस नाही.
8. Self branding ची कमी जाणीव
“मी कोण आहे?”
“माझा USP काय आहे?”
“मी इतरांपेक्षा वेगळा का आहे?”
हे विचारच केलेले नसतात.
📌 Customer ला तुम्ही काय करता यापेक्षा,
तुम्ही का करता – हे समजायला हवं.
9. संपर्क करायला सोपा मार्ग नसतो
ग्राहकाला call करायचा – पण नंबर मिळत नाही
WhatsApp करायचा – पण DP नाही, reply नाही
ऑर्डर करायची – पण फॉर्म नाही, लिंक नाही
📌 Professional दिसायला तुम्ही “available” हवे.
10. Appearance कडे दुर्लक्ष
- टपरीचा बोर्ड faded
- दुकानात दिवा कमी
- डब्यांवर चिठ्ठ्या नाहीत
- तुमचं branding zero
📌 Visual neatness = Trustworthiness
मग काय करायचं?
“Small Business with Big Branding”
हा विचार लावा.
- व्हिजिटिंग कार्ड छापून घ्या
- Instagram/Facebook page सुरू करा
- Google My Business मध्ये नाव टाका
- QR Code लावा
- uniform (logo t-shirt) ट्राय करा
- client feedback घ्या
- एक system बनवा
- rates, services clarity ठेवा
- invoice app वापरा
📌 व्यवसाय म्हणजे केवळ ‘बेचणं’ नाही…
तो तुमचा ‘पब्लिक इमेज’ आहे.
शेवटी…
“मराठी माणूस मेहनती आहे, शंभर टक्के आहे…
आता फक्त त्याला त्याच्या व्यवसायात ‘प्रोफेशनल टच’ द्यायचा आहे.”

Leave a Comment