HOME

stories

STORIES

google-news

FOLLOW

FOLLOW

JOIN

२०००० हजारच्या नौकरीला इज्जत आणि ४०००० हजार पाणीपुरीवाल्याला कुत्र्यावानी वागवणूक

by

admin

Updated: 01-06-2025, 05.51 AM

Follow us:

“तो पाणीपुरी विकतो… पण त्याच्याकडे स्वतःची गाडी आहे.”

एक दिवस मी एका शाळेच्या बाहेर उभा होतो.
तीन वाजता मुलं बाहेर येत होती, आणि बाहेर एक पाणीपुरीवाला मोठ्या गर्दीत बिझी होता.

त्याचं गाडं अगदी स्वच्छ, युनिफॉर्ममध्ये तो, बाजूला QR कोड, आणि अगदी व्यवस्थित सिस्टम.
दहा मिनिटं त्याचं काम बघत होतो — अगदी प्रोफेशनल.

काही वेळाने माझ्या शेजारी उभा असलेला एकजण बोलला —
“ह्याचं काय आहे? पाणीपुरी विकतोय… काही भविष्य नाही याला.”

मी गप्प झालो. कारण हेच वाक्य मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा ऐकलं आहे.

आपण २५,००० रुपये पगाराची नोकरी करणाऱ्याला “सेट झालाय” म्हणतो.
आणि ४०,००० कमावणाऱ्या गाड्यावर उभ्या माणसाला “काहीतरी करतोय” असं म्हणतो.

का?

कारण आपल्या समाजात कमाईपेक्षा काय काम करतोस हे जास्त महत्वाचं मानलं जातं.

पाणीपुरी विकणं म्हणजे कमीपणा.
मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी… सगळ्यांची नजर वेगळी होते.
“पोरगं इंजिनिअरिंग करून शेवटी गाड्यावर आलं…”

कोणी हे बघतच नाही की त्या गाड्यावरून तो मुलगा महिन्याला ४०,००० कमावतोय, कोणालाही हात न पसरता.

त्याला boss नाही, targets नाहीत, आणि politics तर अजिबात नाही.

पण नाही – शर्ट-पॅण्ट घालून AC ऑफिसमध्ये बसायचं, मगच समाजात मान.

असं का?
कारण आपल्याला शिकवलं गेलंय – “काम कोणतं करतोस?” हे identity ठरतं.

म्हणूनच मराठी माणूस छोटं का होईना, एक secure job पकडतो.
आणि मोठ्या profit देणाऱ्या पण छोट्या दिसणाऱ्या कामाला नकार देतो.

एका पिढीने ही भावना पुढच्या पिढीकडे दिली –
“सन्मान नोकरीत आहे, व्यवसायात नाही.”

पण आता वेळ आहे बदलाची.

आज पाणीपुरीवालाही brand करतोय.
QR कोड लावतोय, Zomato-स्विगीवर आहे, मेनू कार्ड लावतोय.
आणि आपण मात्र अजूनही ‘सामाजिक इमेज’च्या चौकटीत अडकून आहोत.


“मान, सन्मान, प्रतिष्ठा ही कामात नसते – ती काम कसं केलं यावर ठरते.”
रक्कम बघा, प्रामाणिकपणा बघा, मेहनत बघा — कामाचं नाव नव्हे!”

Blog Layout

Leave a Comment

आमच्याबद्दल

आमचं हे न्यूजचं साइट मस्त ताज्या-ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला बनवलंय. देश-विदेश, राजकारण, क्रीडा, सगळं सरळ-सोप्या भाषेत देतो. खोटं-फोटं काही नाही, खरी माहितीच देण्याचा आमचा ध्यास आहे. तुमी अपडेट राहा, बाकी आम्ही बघतो!